Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा परिषदेत पीएमएस प्रणाली बंद

जिल्हा परिषदेत पीएमएस प्रणाली बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेत ( Zilla Parishad Nashik )पीएमएस ( PMS ) ही ऑनलाईन प्रणाली सध्या बंदच असल्याने जुन्याच (स्व हस्ताक्षर) पध्दतीने बिले अदा करण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेस प्राप्त झाले आहे. पत्र प्राप्त होताच काल पहिल्याच दिवशी सुमारे सात ते आठ कोटींची 114 बीले काढण्यात आली.

- Advertisement -

मागील महिन्यात वीस दिवस बंद असलेली जिल्हा परिषदेत ठेकेदारांनी कामे केल्यानंतर त्यांच्या कामांचे बीले देण्यासाठी कार्यन्वीत असलेली पीएमएस प्रणाली पुन्हा ठप्प झाली होती. पीएमएस या प्रणालीची सेवा पुरवणार्‍या सीडॅक या कंपनीशी करार संपुष्टात आला असून शासनाकडून कराराचे नूतनीकरण न केल्याने ही प्रणाली बंद करण्यात आली आहे. सीडॅक कंपनीने पीएमएस साईड बंद केली असून पुढील सेवा देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

दिवाळीच्या तोंडावर आल्याने ठेकेदारांना बिले वेळेत मिळावी, यासाठी त्यांच्याकडून तगादा लावला जात आहे. पीएमएस प्रणाली पूर्ववत सुरू होईपर्यंत ऑफलाईन बीले देण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. जिल्हा परिषदेने त्यानंतर धावपळ करून प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सीडॅक संस्थेचे 40 लाख रुपये देणे थकल्याने त्याबाबत प्रशासन निर्णय घेऊ शकले नाही.

यामुळे तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. पीएमएस प्रणाली पूर्ववत सुरू होत नाही, तोपर्यंत बीले ही ऑफलाईन पध्दतीने काढण्यात यावी, असे आदेशाचे पत्र काढण्यात आले. त्यानुसार या प्रणालीबाबत निर्णय होईपर्यंत ऑफलाईन पध्दतीने बिले देण्यास जिल्हा परिषदेस परवानगी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या