Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याHappy Birthday PM Modi : शरद पवार, लता मंगेशकर यांच्यासह अनेक क्षेत्रातील...

Happy Birthday PM Modi : शरद पवार, लता मंगेशकर यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिगज्जकांडून शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. भारतीय जनता पक्षाने मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हंटले आहे,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताच्या जीवन-मूल्ये आणि लोकशाही परंपरेत आपण निष्ठेचा एक आदर्श सादर केला आहे. माझ्या शुभेच्छा आणि प्रार्थना करतो की देव तुम्हाला नेहमीच निरोगी आणि आनंदी ठेवो आणि राष्ट्राला तुमच्या अमूल्य सेवा मिळत राहो.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लता मंगेशकर यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना म्हंटले की ‘ नमस्कार, आदरणीय नरेंद्रभाई, तुम्हांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ईश्वर तुम्हांला कायम यशस्वी बनवू दे, तुम्ही दीर्घायुषी व्हा हीच मंगलकामना! ‘ असा आशिर्वाद दिला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत म्हंटले आहे की,”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमची कायम निरोगी व तंदुरूस्त राहा हीच प्रार्थना. दीर्घायुष्यासाठी सदिच्छा”

ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांनी मोदींना सदिच्छा दिल्या. त्यांनी म्हंटले आहे की, “भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे.”

- Advertisment -

ताज्या बातम्या