Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

देशात व सध्या राज्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात महाराष्ट्रातची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मार्चला पहिला डोस घेतला होता. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली.पंतप्रधानांनी पहिला डोस घेतला होता तेव्हा ते म्हणाले होते, “आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लशीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी.”

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या