Thursday, April 25, 2024
Homeनगर‘पीएम किसान’साठी 31 जुलैपर्यंत केवायसी ऑनलाईनची मुदत

‘पीएम किसान’साठी 31 जुलैपर्यंत केवायसी ऑनलाईनची मुदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या; मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकर्‍यांनी 31 जुलै 2022 पर्यंत ‘केवायसी’ ऑनलाईन करून घ्यावी. अन्यथा ‘केवायसी’ अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते, असे आवाहन ‘पीएम किसान’ योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम मे 2022 पर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेस 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील 41.11 टक्के लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा ‘पीएम किसान’ अ‍ॅपमध्ये ओटीपी द्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर 15 रुपयांच्या नाममात्र शुल्कात केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करता येईल, असे आवाहनही निचित यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या