Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधसुख आणि सौभाग्यासाठी या रंगांनी खेळा होळी

सुख आणि सौभाग्यासाठी या रंगांनी खेळा होळी

होळी , रंगांचा सण, जवळ येत आहे. यंदा होळी 18 मार्चला आहे. यादिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलालाची उधळण करतात. प्रत्येकाचा चेहरा लाल, हिरवा, गुलाबी किंवा गुलालाने रंगवला जातो. रंग हे आनंद, नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. यंदा होळीच्या निमित्ताने वास्तुनुसार रंगांची निवड करून तुमचे नशीब उजळवू शकता. चला जाणून घेऊया की वास्तूनुसार कोणत्या रंगांनी होळी खेळल्याने आनंद आणि सौभाग्य वाढते .

1. लाल रंग- लाल रंग किंवा गुलालाने होळी खेळल्याने आरोग्य आणि प्रतिष्ठा वाढते. लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. या रंगाच्या वापराने मंगळ मजबूत होतो. मात्र, ज्या लोकांना लवकर राग येतो किंवा जे डिप्रेशनमध्ये असतात, अशा लोकांनी लाल रंगाचा वापर टाळावा. लाल रंग आग्नेय दिशेला सूचित करतो.

- Advertisement -

2. हिरवा रंग- हिरवा रंग किंवा गुलाल लावून होळी खेळल्याने आनंद, समृद्धी, प्रेम, प्रगती आणि आरोग्यात वृद्धी होते. हिरवा रंग समृद्धी, प्रेम, प्रगती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. हिरव्या रंगाच्या वापराने बुध ग्रह मजबूत होतो. निर्णय क्षमता, बुद्धिमत्ता, विवेकबुद्धी वाढते. व्यवसायात प्रगती होईल. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगानेही होळी खेळू शकता. हा रंग जीवनात शांती आणतो. हिरवा रंग उत्तर दिशेचे प्रतीक मानला जातो.

3. पिवळा रंग- पिवळ्या रंगाने होळी खेळल्याने प्रेम, सौंदर्य, आनंद वाढतो. भगवान श्रीकृष्णाला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग देखील गुरु ग्रहाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या वापराने यश, कीतीर्र् वाढते. एखाद्याच्या नात्यात आंबटपणा आला असेल तर त्याच्यासोबत पिवळ्या रंगाची होळी खेळावी. त्यामुळे निराशा दूर होते. पिवळा रंग उत्तर-पूर्व दिशा दर्शवतो.

5. निळा रंग – या रंगाने होळी खेळल्याने आरोग्य लाभते. तुम्ही आजारी लोकांना निळा गुलाल लावू शकता. निळा रंग देखील शनिदेवाचे प्रतीक आहे. याच्या वापराने शनिदेवाची कृपाही मिळू शकते. त्याचा वापर सुरक्षिततेची भावना मजबूत करतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या