पेठ : कृषी अधिकारी एसीबीच्या जाळयात

jalgaon-digital
1 Min Read

पेठ | प्रतिनिधी Peth

नाशिक -करंजाळी,Karanjali तालुका पेठ, येथील कृषी केंद्राचे, शेती उपयोगी बी बियाणे, रासायनिक खते व कीटक नाशके यांचा स्टॉक योग्य असल्याचे दाखवणे तसेच कृषी केंद्राच्या परवाना License of Agriculture Center नूतनीकरणासाठी renewal अडचण येवू न देण्यासाठी यातील कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल बागूल, जयंत शिरसाठ ला.प्र.वि ,नाशिक यांनी सापळा रचला. त्यात पाच हजार रुपये लाचेची रक्कम कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी पंचासमक्ष स्वीकारली. त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनील कडासने , प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, सतीश डी.भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *