Friday, April 26, 2024
Homeनाशिक७४ गणेश मंडळांना परवानगी

७४ गणेश मंडळांना परवानगी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या गर्दीतून करोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनानंतर महापालिका प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहे.

- Advertisement -

यात सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारणीसाठी न्यायालयाने अगोदरच निर्बंध घातले असुन याच पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.20) पर्यत शहरातील 336 पैकी 74 सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिका प्रशासनाकडुन परवानगी देण्यात आली असुन आज श्री स्थापना होणार असुन परवागीत काही भर पडणार आहे.

यंदा मात्र 2020 हे वर्ष जागतिक करोना सारख्या महामारीने ग्रस्त झालेले असल्याने केंद्र व राज्य सरकार, तसेच महानगरपालिकेने इतर सणांप्रमाणेच गणेशोत्सवावरही काही नियम व निर्बंध घातलेले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने ऑनलाईन स्वरुपात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते.

यानुसार 20 ऑगस्टपर्यत महापालिकेकडे 336 अर्ज दाखल झाल्यानंतर यातील 189 अर्ज विविध कारणास्तव नाकारण्यात आले आहे. यातील केवळ 74 मंडळांनाच अटी शर्थीसह मंडपासाठी परवानगी देण्यात आली असुन परवानगीच्या प्रतिक्षेत केवळ 73 अर्ज शिल्लक आहे.

मागील वर्षात शहरातील 397 मंडळांनी ऑन लाईन अर्ज केले होते, यातील 374 मंडळांना परवानगी देण्यात आली होती. यंदा करोनाचा मोठा फटका गणेश मंडळांना बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या