Thursday, April 25, 2024
Homeजळगावचाळीसगावातील नदी पात्रातील अतिक्रमनास लोकप्रतिनिधी जबाबदार

चाळीसगावातील नदी पात्रातील अतिक्रमनास लोकप्रतिनिधी जबाबदार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव येथील नदी सुशोभीकरणच्या River beautification नावाने कोटीचे कमीशन घेऊन नदीपात्रात अतिक्रमणे encroachment केल्यामुळे नदीपात्र अरूंद झाले म्हणून चाळीसगावच्या नदी काठावरील वस्तीत घरात पाणी शिरले प्रचंड वित्तहानी, मनुष्यहानी झाली याला जबाबदार लोकप्रतिनिधी People’s representatives are responsible आहेत, त्यांच्याकडून नागरिकांची झालेले हानी दंडासह महाराष्ट्र शासनाने Government of Maharashtra वसुल करावा. या लोकप्रतिनिधींना नैतिकता Ethics म्हणून जबाबदारी ने राजीनामा Resigned द्यावा नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावे तसेच औषधी फवारणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागतर्फे Jan Andolan Khandesh Division करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे की, आपणास जनहितार्थ निवेदन देण्यात येते की, चाळीसगाव येथील नदी सुशोभीकरण च्या नावाने कोटी चे कमीशन घेऊन नदीपात्रात अतिक्रमणे केल्यामुळे नदीपात्र अरूंद झाले म्हणून चाळीसगाव च्या नदी काठावरील वस्तीत घरात पाणी शिरले प्रचंड वित्तहानी, मनुष्यहानी झाली याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, म्हणून यांच्या कडून नागरिकांची झालेले हानी दंडासह महाराष्ट्र शासनाने वसुल करावा.

या लोकप्रतिनिधींना नैतिकता म्हणून जबाबदारीने राजीनामा द्यावा. नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावे. तसेच औषधी फवारणी त्वरित करण्यात यावी. नदी काठावरील दर्ग्यापरीसरांतील गरीब बेघर निराधार मनोरुग्ण संख्या १००-२०० पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहे अशी चर्चा आहे, यांचा शोध घेण्यात यावा स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीही माहिती लपवून ठेवली आहे. तसेच ग्रामीण भागात वित्त व मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे मात्र पंचनामे मध्ये बरीच माहिती लपवून ठेवली आहे मात्र भाजपचे मतदार असलेल्या चे वित्तहानी ची माहिती पंचनामे दिलेली आहे.

महापूर ओसरला मात्र गटारी तुंबल्या,सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साथीचे आजार वाढणार,नगरपालिकेचे दुर्लक्ष, साथीचे आजाराने एकदा नागरिक दगावल्यास नगरपालिका आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या विरोधात गुन्हे दाखल करणार अशा नागरिकांचा इशारा, नगरपरिषद चाळीसगाव जि जळगाव येथे कायम स्वरुपी मुख्याधिकारी, प्रशासनातील अधिका-यांची ची नेमणूक करण्यात यावे, जेणे करून शहरातील आरोग्य संदर्भातील कामे सुरळीत होतील, महापूर ओसरल्यानंतर नदीकाठ परिसरातील गटारी हया घाणीमुळे तुंबल्या असून नगरपालिकचे स्वच्छता अधिकारी व कर्मचार्‍यांचे हयाकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात दुर्गंधीचा सामना नागरिकाना करावा लागत आहे.

त्यामुळे डासांसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने डासांची पैदास वाढलेली आहे. डासांची पैदास वाढल्याने शहरात डेग्यू , मलेरिया रूग्णाचीं संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. अगोदरचं कोरोना आणि त्यानंतर आलेल्या महापूरामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला असून शहरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नागरिकांची स्थिती बिकट होईल. नगरपालिकेतील स्वच्छता अधिकारी व कर्मचारी फक्त फोन वर परिसर व गटारी स्वच्छ झाल्याचा अहवाल नगरसेवकांना देत असल्याने परिसरात व गटारी घाणीमुळे तुंबलेल्या चित्र सर्वत्र दिसत आहे.

कामाच्या ठिकाणी स्वता थांबून परिसरातील व गटारीतील घाण काढे पर्यत थांबून परिसर साफ करणे गरजचे आहे. अधिकारी व नगरसेवकांची पाठ उळताच कर्मचारी काम सोडून निघून जातात अशी ओरड देखील नागरिकांमधून होत आहे. महापूराचे पाणी ओसरून तीन दिवस उलटल्यानंतर देखील गल्ली, नगरांमध्ये घाणीचे साम्राज्य आजही जैसे थै दिसत आहे. गटारी मध्ये तुंबलेल्या घाणीमुळे घरातही घाण वास येत आहे.

दुर्गधीमुळे घराच्या बाहेर थोडा वेळ देखील उभे राहून शकत नसल्याची संतप्त भावना नदीपात्र परिसरातील रहिवाश्यांनी व्यक्त केली आहे. गटारींच्या दुरूस्तीकडे नगरपालिका प्रशासनाचे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाल्याने शहरातील अनेक गटारी हया तुटलेल्या आहे.भूमिगत गटारीच्या नावामुळे पाच वर्षात एकही गटारीची दुरूस्ती न झाल्याने गटारी पूर्णपणे तुटलेल्या आहेत, त्यामुळे गटारीत साचलेल्या घाणीमुळे गटारीचे घाण पाणी रहिवाश्याच्या दारात येत आहे.

त्यामुळे डासांचे प्राद्रर्भाव वाढलेला आहे. गटारीत साचलेली घाण त्वरित काढून शहर डेग्यू , मलेरिया रूग्णांचे हॉट स्पॉट ठरणार यांची काळजी नगरपालिका आरोग्य प्रशासनाने घ्यावी, अन्यथा साथीच्या आजारामुळे एकदा रूग्ण दगाविल्यास त्यास नगरपालिका आरोग्य निरीक्षकांसह प्रशासन, लोकप्रतिनिधी जबाबदार राहील. या निवेदनावर जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रा गौतम निकम, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, आर के माळी, सागर नागणे, संदिप पाटील आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या