Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगोदाकाठ कोविड सेंटरचे असेही औदार्य

गोदाकाठ कोविड सेंटरचे असेही औदार्य

नाशिक । Nashik
करोना काळात एकीकडे डॉक्टरांकडून अव्वाच्या सव्वा लूट करीत नागरिकांकडून वारेमाप बिल उकळले जात असताना गोदाकाठ भागातील चांदोरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या विंचूर येथील महिलेचे सुमारे सत्तर हजार रुपये बिल माफ करण्यात आले.

विंचूर येथील सुनीता सारंधर भिंगारकर ही महिला कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर चांदोरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. या उपचारासाठी विंचूर येथील महानुभाव पंथाचे भिंगारकर बाबा यांनी 70 हजार रुपये कोविड सेंटरमध्ये जमा केले होते.

- Advertisement -

परंतु , डॉ. किरण सानप, डॉ.उत्कर्ष शिंदे, डॉ. उत्तम फरताळे, डॉ. विजय डेर्ले. डॉ. रोहित थोरकर, डॉ. सारिका डेर्लेे यांनी भिंगारकर बाबा यांना सत्तर हजारांपैकी फक्त मेडिकलचे 30 हजार रुपये घेऊन उर्वरित चाळीस हजारांची रक्कम परत करत नवा आदर्श घालून दिला.

भिंगारकर बाबा हे महानुभाव पंथाचे असून आश्रमाच्या माध्यमातून ते जनसेवाच करीत असतात. त्यामुळे आपणही समाजाचे काही देणे लागतो. या उदात्त भावनेतून कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी केवळ औषधांचे 30 हजार रुपये घेत उरलेली रक्कम बाबांकडे परत सुपूर्द केली.

करोना काळात अनेक डॉक्टरांनी वारेमाप बिलांची वसुली केली. काहींनी तर बिल भरल्याशिवाय मृतदेह देखील ताब्यात दिला नाही. अशा काळात चांदोरी येथील डॉक्टरांनी दाखविलेल्या औदार्याचे गोदाकाठ भागातून कौतुक होत आहे.

यावेळी चापडगाव येथील प्रगतशिल शेतकरी व महानुभाव पंथाचे अनुयायी वाळिबा रामचंद्र दराडे,पोलीस पाटील रमेश आव्हाड, माजी सरपंच बबन दराडे, धोंडीराम दराडे, उद्धव दराडे, आप्पा दराडे,सागर दराडे,विकास दराडे, पवन दराडे, ज्ञानेश्‍वर दराडेे, भगवान दराडे, राजेंद्र दराडे यानीं कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या