Wednesday, April 24, 2024
Homeजळगाव‘तो’ वन्यप्राणी बिबट्या नव्हे तडस

‘तो’ वन्यप्राणी बिबट्या नव्हे तडस

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

तालुक्यातील पाथरी येथे 26 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता रस्ता ओलांडतांना मजुरांना वन्यप्राणी दिसला होता.

- Advertisement -

सदरचा वन्यप्राणी बिबट्या असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र मंगळवार, 27 जुलै रोजी वनविभागाचे कर्मचारी दिपक पाटील यांच्या संबंधित प्राण्याचे शेतशिवारात उमटलेल्या ठशांची पाहणी केली असून तो बिबट्या नसून तडस नावाचा वन्यप्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रस्ता ओलांडून पाथरी येथील धरमसिंग पाटील, सिंधूबाई पाटील यांच्या शेतातून वन्यप्राण्याने संचार केला होता. ग्रामस्थांनी माजी सरपंच विद्यमान ग्रा. पं. सदस्य निलेश पाटील यांना कळविले होते.

प्रकाराची माहिती मिळाल्यावर दि. 27 रोजी सकाळी वनविभागाचे दिपक पाटील यांनी प्रत्यक्ष येवून शेतशिवारातील वन्यप्राण्याचे ठशांची पाहणी केली.

त्यात हा प्राणी बिबट्याचा प्रकार नसून तो तडसाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झालो. शेतकर्‍यांनी घाबरुन जावू नये. असे आवाहन वनकर्मचारी दीपक पाटील यांनी केले यावेळी पाथरीचे पोलिस पाटील संजीव लंगरे, ग्रा. पं. कर्मचारी मुरलीधर नेटके उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या