Thursday, April 25, 2024
Homeनगरपाथरेला 3 तर भगवतीपूरमध्ये एका ठिकाणी घरफोडी

पाथरेला 3 तर भगवतीपूरमध्ये एका ठिकाणी घरफोडी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रूक येथे तीन ठिकाणी तर भगवतीपूर येथे एक ठिकाणी शनिवारी एकाच रात्री घरफोड्या झाल्या. याशिवाय एका ठिकाणी घराची कडी तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पाथरे बुद्रुकमध्ये खळबळ उडाली असून परिसरात वाढत्या चोर्‍या ही चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या घटनेत पाथरे बुद्रुक येथील पोपट विठ्ठल घोलप यांच्या बंद असलेल्या बंगल्याचा कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील 55 हजारांचा ऐवज लांबविला. त्यापैकी 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. पोपट घोलप व त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेले होते.

दरम्यान पाथरे बुद्रुक येथील घोलप वस्तीजवळील रहिवासी अनिल भाऊसाहेब घोलप, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आण्णासाहेब भाऊसाहेब कडू त्याचप्रमाणे भगवतीपूरचे माजी सरपंच सुनील केशवराव शिंदे यांच्याकडेही घरफोडीची घटना घडली आहे. पाथरे येथील किशोर गंगाधर कडू यांच्याकडे घराच्या दरवाजाची कडी तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. सौरभ संजय घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या