Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशआता रेशन दुकानातूनही काढता येणार पासपोर्ट, पॅन कार्ड

आता रेशन दुकानातूनही काढता येणार पासपोर्ट, पॅन कार्ड

नवी दिल्ली

सर्वसामान्य नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. आता रेशन दुकानातही (ration dukan) पासपोर्ट (passport)आणि पॅन कार्डसाठी (pan card)अर्ज करता येणार आहे. तसेच वीज आणि पाण्याचे बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारले जाणार आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत ही योजना तयार केली आहे.

- Advertisement -

देशातील सर्व रेशन दुकाने आता कॉमन सर्व्हिस सेंटर (cse) बनवली जाणार आहे. त्यानंतर रेशन दुकानात पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. रेशन धान्य दुकान चालवणा-या दुकानदारांना सुविधा पुरविण्याबाबत निवड करता येणार आहे.

रेशन दुकानदारांसमोर पर्याय

रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. सीएससी अंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे.

नागरिकांना मोठा फायदा

या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून, या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, यामुळे रेशन दुकानांचे उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या