Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरीत 63 पारधी कुटुंबियांना पन्हाळी पत्र्याचे वाटप

राहुरीत 63 पारधी कुटुंबियांना पन्हाळी पत्र्याचे वाटप

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळा येथे राहुरी तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील कुटुंबियांना आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्याकडून पारधी विकास योजना सन 2021-22 मधून 63 कुटुंबियांना नऊ लाख 62 हजार रुपये किंमतीचे पन्हाळी पत्रे प्रतिकुटुंब आठ पत्र्यांचे वाटप एकूण 63 कुटुंबियांना एकूण 504 पत्रे ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी राहुल गवळी, भारत भुजाडी, नंदकुमार गागरे, सरपंच ज्ञानदेव बाचकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पारधी समाजाला इतरही योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. तनपुरे म्हणाले. तसेच पारधी समाजाने मुलांना शिक्षण द्यावे व शासनाचे विविध योजना व कुटुंबियांचा स्तर उंचवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रस्तावना जाधव यांनी केली व आभार भिंगारदिवे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या