Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारटीईटी घोटाळयाचा समांतर तपास ईडीमार्फत होणार!

टीईटी घोटाळयाचा समांतर तपास ईडीमार्फत होणार!

दत्तात्रय सूर्यवंशी

तळोदा | – TALODA

- Advertisement -

शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) (टीईटी) घोटाळाप्रकरणी (case of fraud) गैरव्यवहाराचा समांतर तपास (parallel investigation of malpractice) आता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) (Directorate of Enforcement) केला जाणार आहे. त्यामुळे देशभरातील विविध भागात घोंघावत असलेले ईडी नावाचे वादळ आता नंदुरबार जिल्हयातही धडकण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षा पदभरतीत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण क्षेत्रातील बड्या अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. हा घोटाळा एजंटांमार्फत राज्यभर झाल्याचे उघडकीस आले होते.

परिक्षेचे पेपर फुटल्याची माहिती समाज माध्यमातून प्रसारित झाली होती. या प्रकाराला वाचा फुटल्यावर पूणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने या गैरव्यवहाराचा कसून तपास केला.

त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परिक्षेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात पूण्याहून नंदुरबारपर्यंत तपासाची सुत्रे हलवली गेली होती. नंदुरबार जिल्ह्यातील किती परीक्षार्थी यांत समाविष्ट आहेत, हे समोर येईल.

त्याचा कर्ता-करविता धनी कोण? हे ही तपासात निष्पन्न होईल. आजपर्यंत एजंटांची नावे अधिकृतरीत्या बाहेर आली नसली तरी ईडीच्या प्रवेशाने ती उघड होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ७ हजार ८७४ प्रशिक्षार्थी दलालांमार्फत केलेल्या घोटाळ्यातून पास झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पुणे पोलिसांप्रमाणेच राज्यातील मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा तपास ईडीकडून केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पाच लाखांचा पुढील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांचा समांतर तपास केला जाऊ शकतो. ईडीने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मागून घेतली असून त्याचा समांतर तपास केला जाणार असल्याचे समजतेे.

या पेपरफुटी प्रकरणाशी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक एजंटांमार्फत परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यासोबतच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आरोग्य विभाग या परिक्षांमधेही जिल्ह्यातील दलालांनी कमाई केली आहे.

यातही पास झालेल्यांचा निकाल आला, पासही झाले. मात्र नियुक्तया रखडल्या आहेत. तिन्ही विभागातील परिक्षा आयोजनाचे कंत्राट घेतलेल्या वरिष्ठ अधिकारी, एजंट, क्लास संचालक आदी बड्या धेंडांच्या मुसक्या आवळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या