Friday, April 26, 2024
Homeनाशिकमुंबई अब दूर नही! नाशिकमार्गे पंचवटीसह 'या' एक्स्प्रेस होणार पूर्ववत

मुंबई अब दूर नही! नाशिकमार्गे पंचवटीसह ‘या’ एक्स्प्रेस होणार पूर्ववत

नाशिकरोड | प्रतिनिधी

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी मुंबईला रोज ये-जा करणा-या नाशिककरांसाठी पंचवटी बरोबरच मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस 25 जूनपासून सुरु होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे…

- Advertisement -

या गाड्या 1 जुलैपासून सुरू होणार होत्या. परंतु, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन एक आठवड़ा अगोदरच पंचवटी सुरु होत आहे. पहिल्या लॉकडाउननंतर पंचवटी 12 सप्टेंबर 2020 रोजी सुरु झाली होती.

मात्र, करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. तोटा वाढल्याने पंचवटी, नंदीग्राम, तपोवन, जनशताब्दी आदी गाड्या 27 एप्रिलपासून बंद करण्यात आल्या होत्या. नाशिकमार्गे दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेसही बंद करण्यात आली होती.

पंचवटीला समांतर जनशताब्दी, राज्यराणी, नंदीग्राम, तपोवन या गाड्याही कडक लॉकडाउन व तोट्यामुळे बंद केल्यामुळे मुंबईला नोकरी-व्यवसायासाठी अपडाऊन करणा-या नाशिककरांची मोठी गैरसोय झाली आहे.

त्यातच एसटी सेवाही बंद होती. अनेकांचा रोजगार, व्यवसाय बंद झाला. आता राजधानी, तपोवन, राज्यराणी या गाड्याही सुरु झाल्या आहेत. पंचवटी सुरु करण्यासाठी रेटा वाढला होता. आता ती गाडीही सुरु होत आहे.

मात्र, तिची कोचेसची संख्या कमी करण्यात आल्याचा दावा करत रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोचेसची संख्या वाढवावी, मासिक पासधारकांची सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या