Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशAadhaar-Pan Card Link : आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली, घरबसल्या कसं कराल...

Aadhaar-Pan Card Link : आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली, घरबसल्या कसं कराल लिंक?

दिल्ली | Delhi

पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं प्रत्येक व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक ठिकाणी या कागदपत्रांचा उपयोग होतो. तसेच, सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे.

- Advertisement -

दरम्यान आयकर विभाग आणि सरकारने आधार पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या वेबसाईटला आधार पॅन लिंक करताना अनेकांना अडचणी जाणवत होत्या. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आता आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी आधार पॅन लिंक करण्याची मुदत ही 31 मार्च 2023 होती. ही मुदत संपल्यानंतर पॅनकार्ड रद्द होणार होतं. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

सरकारने आधार – पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढविली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत हे काम मोफत केले जात होते. परंतू 1 एप्रिल 2022 नंतर हे काम करण्यासाठी 500 रूपये फि आकारली जात होती. नंतर 1 जुलैनंतर एक हजार रूपये फि आकारली जात आहे. सध्या 31 मार्चपर्यंत याच शुल्कावर पॅन- आधारकार्डशी लिंक केले जात आहे.

इन्कम टॅक्सचा कायदा कलम 139 अअ नूसार 1 जुलै 2017 पूर्वी सर्व पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. सरकारने जुलै महिन्यात संसदेत सांगितले होते की आतापर्यंत 61,73,16,313 लोकांना पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे. यात 46,70,66,691 लोकांनी आपले पॅनकार्डला आधार कार्डाशी लिंक केले आहे.

नोकरदारांना गुड न्यूज! PF व्याजदरात मोठी वाढ

इन्कम टॅक्स विभागाने तीन वर्गवारीच्या लोकांना आधार लिंक करण्यापासून सूट दिली आहे. यात आसाम, जम्मू-कश्मीर आणि मेघालय राज्यातील नागरिक आणि अनिवासी भारतीय म्हणजे एनआरआय लोकांना सूट देण्यात आली आहे. तसेच 80 वर्षांवरील व्यक्तींनाही आधार – पॅनकार्ड लिंक करण्यापासून सूट आहे. या वर्गवारी वगळता सर्वांना पॅन – आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

Mumbai-Pune Expressway : नागरिकांनो, मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’चा प्रवास महागणार कारण…

घरबसल्या स्मार्टफोनवरून कसं कराल लिंक?

आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टीकडे जाण्याची गरज नाही.

पॅन कार्ड वैध राहण्यासाठी कागदपत्रं त्वरित लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल. आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल.

Atique Ahmed : उमेश पाल प्रकरण नेमकं आहे काय? ज्यामध्ये अतिक अहमदसह तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली

जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या