Friday, April 26, 2024
Homeनाशिकसात गावातील सातबारा उतारे बंद करण्याचे आदेश

सात गावातील सातबारा उतारे बंद करण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिका हद्दीतील 7 गावांतील बिन शेती सातबारा उतारे बंद करण्यासाठी तहसीलदार नाशिक यांनी आदेश पारित केले आहे. त्यानुसार तहसीलदार यांनी तलाठी यांना उतारे बंद करण्यासाठी कळविलेले आहे.

- Advertisement -

उर्वरित गावा करिता सातबारा बंद करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे दुहेरी नोंद पद्धतीमुळे नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

सातपूर,चुंचाळे, पिंपळगाव बहुला, आनंदवल्ली, गंगापूर, आगरटाकळी, नांदूर ,मानूर, दसक, पंचक, देवळाली या गावातील शेती सातबारा उतारे बंद करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून कार्यवाही प्रगतीत आहे. तसेच सातपूर,वडाळा, विहितगाव, चेहेडी, चाडेगाव, नाशिक, पाथर्डी येथील काही सातबारा उतारे बंद करण्यासाठी आदेश झालेले आहेत. सदर सातबारे उतारे बंद करण्याची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

जमीन व स्थावर मालमत्ता खरेदी विक्री मधील फसवणूक टाळण्यासाठी व या व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने 30 सप्टेंबर2018 रोजीच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख पुणे यांनी काढलेल्या परिपत्रकानूसार (महसुली व भूमिअभिलेख) अशी दुहेरी नोंद पद्धती बंद करण्यात येऊन सात बारा उतारे बंद करण्याचा व नागरिकांना आता फक्त प्रॉप्रर्टी कार्ड देण्याचा आणि यापुढे प्रॉपर्टी कार्डच्या आधारे पुढील व्यवहार करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याकरिता नगर भूमापन अधिकारी नाशिक आणि उप अधिक्षक भूमी अभिलेख नाशिक यांचे कार्यालय कडून नाशिक महानगरपालिका हद्दीतील नगर भूमापन योजना लागू झालेल्या गावातील ज्या मिळकतींचे बिनशेती सातबारा अस्तित्वात आहेत आणि त्याचबरोबर मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड सुद्धा अस्तित्वात आहेत अशा मिळकतींचे बिनशेती सातबारा उतारे बंद करण्यासाठी प्रस्ताव तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

दुहेरी नोंद पद्धतीमुळे नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना आपल्या मिळकती संबंधी दोन्ही कार्यालयांमध्ये अधिकार अभिलेख अद्यावत करण्यासाठी कार्यवाही करावी लागत होती. परंतु आता सातबारा उतारे बंद केल्यामुळे प्रॉपर्टी कार्डच्या आधारे नोंदी होतील व दोन्ही ठिकाणी नोंदी अद्ययावत करण्याचा त्रास वाचणार आहे. तरी नागरिकांनी नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रॉपर्टी कार्ड वर आपल्या मिळकती संदर्भातील नोंदी अद्यावत करून घ्यावे याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या