Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश“या” तारखेपासून वैष्णोदेवी यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी व हेलिकॉप्टर बुकिंग सुरु

“या” तारखेपासून वैष्णोदेवी यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी व हेलिकॉप्टर बुकिंग सुरु

दिल्ली | Delhi

करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ५ महिने बंद असलेली वैष्णोदेवीची यात्रा (vaishno devi yatra) 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. या यात्रेसाठी केंद्र सरकारने अत्यंत कडक नियमावली जारी केली होती.

- Advertisement -

वैष्णोदेवी यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि हेलिकॉप्टरसाठी बुकिंग २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० पर्यंत उपलब्ध राहणार असल्याची माहिती माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे सीईओ रमेश कुमार जांगिड यांनी दिली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरच्या बाहेरून येणाऱ्या तीर्थयात्रींना करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणावा लागेल. हा रिपोर्ट कटरामध्ये त्यांच्या आगमनाच्या ४८ तासांपेक्षा जुना नसावा, अन्यथा त्यांना तीर्थयात्रेची परवानगी देण्यात येणार नाही. असेही सीईओ रमेश कुमार जांगिड यांनी सांगितले. (online registration and helicopter booking for vaishno devi yatra available between 26th august to 5th september)

- Advertisment -

ताज्या बातम्या