सहा विद्यापीठांतर्फे ‘पत्रकारितेतील नवे आयाम’ वर ऑनलाईन व्याख्यान

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव, jalgaon

महाराष्ट्रातील सहा विद्यापीठाच्या (University) पत्रकारिता व जनसंवाद विभागांतर्फे (Department of Journalism and Mass Communication) 06 जानेवारी रोजी मराठी पत्रकारदिनानिमित्त (Marathi Patrakardina) ‘पत्रकारितेतील नवे आयाम’ (New Dimensions in Journalism ‘) या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे (online lectures) आयोजन करण्यात आले आहे.

मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यान दि.06 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता झूम या अॅपद्वारे घेण्यात येणार आहे. यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, साम टी.व्ही.चे संपादक राजेंद्र हुंजे आणि जयपूर येथील राजस्थान विद्यापीठातील जनसंचार विभागाचे माजी प्रमुख प्रा.डॉ.संजीव भानावत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरु बी.व्ही.पवार राहणार आहे.

या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता या सहा विभागांचा समावेश असणार आहे.

या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण झूम अॅपद्वारे तसेच यु-ट्यूब चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक व पत्रकार तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहभागी विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर (जळगाव), डॉ.रवींद्र चिंचोलकर (सोलापूर), डॉ.मोईज हक (नागपूर), डॉ.निशा पवार (कोल्हापूर), डॉ.उज्वला बर्वे (पुणे), डॉ.दिनकर माने (औरंगाबाद) यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे हे तांत्रिक सहाय्य करणार आहे. अधिक माहिती आणि कार्यक्रम सहभागासाठी इच्छुकांनी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर यांच्याशी संपर्क साधावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *