Friday, May 10, 2024
Homeनगरसव्वाशे दिवसात नऊशे व्हिडीओ

सव्वाशे दिवसात नऊशे व्हिडीओ

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना महामारीने शाळा बंद झाली, पण ऑनलाईन शिकवणी सुरू राहिली. विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून दूर जावू नये यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी मिळून 900 व्हिडीओ तयार करत ते विद्यार्थ्यांना पाठविले. सव्वाशे दिवसात विद्यार्थ्यांना घरबसल्या शाळेत बसल्याचे फिलींग येत असल्याचे सांगण्यात आले. नगर येथील शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशालेने हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.

प्रत्यक्षात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे व्हावे यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन शिकविणे, त्याचबरोबर प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमावर व स्पर्धा परिक्षांवर आधारित व्हिडिओ बनविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्याने सोबत राहून शिक्षक शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.

- Advertisement -

अधिक माहिती देताना मुख्याध्यापिका योगिता गांधी म्हणाल्या, सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण नियमित सुरु असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेले नाही. बालवाडी ते 7 वी पर्यंतचे प्रथम सत्रांचे अभ्यासक्रमांवर आधारित प्रशालेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी सुमारे 900 व्हिडिओ तयार केलेले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणासारखे घरबसल्या शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांच्या स्वनिर्मित व्हिडिओमुळे विद्यार्थी आनंदाने अभ्यास करत आहेत. संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रथम अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला आहे. हे व्हिडिओ डर्रींळींर ठराशीह झहळीेवळर झीरीहरश्रर या यु-ट्युबवर अपलोड करण्याचे कामकाज सुरु आहे. त्याचा ग्रामीण भागासह इतरही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल. प्रशालेतील 1 ली ते 4 थी चे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकाचे वाटप करण्यात आले आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका गांधी यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजयकुमार मुनोत, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोद कटारिया आदिंसह सर्व विश्वस्तांचे सहकार्य मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या