पोलिसाचा ऑनलाईन बिंगो गेमवर छापा

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाडिया पार्कच्या पार्किंगमध्ये बसून मोबाईलवर ऑनलाईन बिंगो गेम खेळण्यासाठी लोकांकडून पैसे घेणार्‍या तरुणाला कोतवाली पोलिसांनी छापा टाकून पकडले. देविदास रमेश सुंबे (वय 30 रा. सारसनगर, मार्केटयार्ड मागे, त्रिमूर्ती चौक, नगर) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस अंमलदार संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून सुंबेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुंबेकडून चार हजार 50 रुपये रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा 54 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक तरुण वाडिया पार्कच्या पार्किंगमध्ये दुचाकीवर बसून मोबाईलवर ऑनलाईन बिंगो गेमसाठी लोकांकडून पैसे घेऊन त्यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आयडी व पासवर्ड देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सोमनाथ राऊत, इनामदार, योगेश भिंगारदिवे, अमोल गाडे, थोरात यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

पथकाने पंचासमक्ष सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास वाडिया पार्कच्या पार्किंगमध्ये छापा टाकून तरुणाला पकडले. त्याच्याकडील मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता फोन पे वरून काही लोकांकडून पैसे घेतल्याचे, व्हॉट्सअ‍ॅपवर आयडी, पासवर्डचे आकडे पाठविल्याचे व साईटद्वारे गेम खेळताना दिसून आले.पोलिसांनी सुंबे याला ताब्यात घेत त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *