Wednesday, May 8, 2024
Homeनगरकांदा चार हजारांच्या टप्प्यात

कांदा चार हजारांच्या टप्प्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)-

गेल्या काही दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलेला कांदा आता पुन्हा खाली आले आहेत. नगरमध्ये काल शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला 4 हजारापर्यंत भाव मिळाला.

- Advertisement -

नगर बाजार समितीत काल 19 हजार 286 क्विंटल गावरान तर 6 हजार 663 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यात दोन्ही कांद्याला प्रथम प्रतवारीमध्ये चार हजार रुपयांचा भाव मिळाला. दुसर्‍या व तिसर्‍या प्रत वारीला 1 ह जार ते तीन हजारपर्यंत भाव मिळाला. दरम्यान जुना गावरान कांदा आता अंतिम टप्प्यात असून लवकर या शेतकर्‍यांकडील या कांद्याचा साठा संपणार असून डिसेंबरपासून नवीन लाल कांद्याची आवक वाढणार आहे. यामुळे कांदा दर आणखी खाली येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

………………

गावरान कांदा दर

प्रथम प्रतवारी 3 हजार 100 ते 4 हजार 100, द्वितीय 1 हजार 900 ते 3 हजार 100, तृतीय 1 हजार ते 1 हजार 900 आणि चतुर्थ 600 ते 1 हजार.

……………..

लाल कांदा दर

प्रथम प्रतवारी 3 हजार 300 ते 4 हजार, द्वितीय 2 हजार 200 ते 3 हजार 300, तृतीय 1 हजार 100 ते 2 हजार 200 आणि चतुर्थ 500 ते 1 हजार 100.

………………..

- Advertisment -

ताज्या बातम्या