Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक1787 हेक्टरवर कांदा लागवड

1787 हेक्टरवर कांदा लागवड

लखमापूर । वार्ताहर | Lakhmapur

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) यंदा उन्हाळ कांद्याची (summer onions) लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने यंदा तालुक्यात कांदा उत्पादन (Onion production) जास्त होणार असे चित्र दिसत आहे. कांदा पिकांने शेतकर्‍यांना (farmers) सुरुवातीलाच रडकुंडीला आणले होते.

- Advertisement -

त्यात कांदा लागवडीसाठी रोपे, मजूर टंचाई आदीमुळे शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली होती. ऐन हंगामात कांदा लागवडीसाठी मजूर न मिळाल्याने बळीराजा मेटाकुटीला आला होता. विविध ठिकाणी जाऊन मजुरांचा शोध घेऊन व लागवडीचा दर निश्चित करतांना मोठे अडथळे पार करावे लागत होते. वाफे पद्धतीसाठी आठ ते नऊ हजार तर बेले पध्दतीसाठी नऊ ते दहा हजार प्रति एकरासाठी मजुरीचे दर घेतले जातात.

एवढे करून ही वेळेवर मजूर उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. या सगळ्या अडचणी पार करून शेतकरी (farmer) वर्गाने कांदा लागवडी (Onion cultivation) मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. दिंडोरी (dindori) तालुक्यातील पश्चिम पट्टा व पुर्व पट्टा कांद्याचे उत्पादन घेण्यात अग्रेसर मानला जातो. या भागातील शेतकरी वर्गाचे अर्थकारण हे पुर्णपणे कांदा या पिकांवर अवलंबून असल्यामुळे सगळीकडे एकाच वेळेस कांदा लागवड केली जाते. त्यामुळे एकाच वेळेस मजूर उपलब्ध करणे शेतकरी वर्गासाठी एकप्रकारे तारेवरची कसरतच होय.

मजुरीव्यतिरिक्त वाहतुकीचा खर्च

मागील काही वर्षांपूर्वी मजूर हे पायी शेतकर्‍यांच्या शेतात येत होते. परंतु शेतीतील यांत्रिकीकरणांमुळे मजुरांवर यांचा परिणाम होईल अशी काळजी होती. परंतु तसे न होता पर्यायी कामांची मोठी उपलब्धता एकत्र कुटुंब पध्दती मोडीत निघाल्याने काही गोष्टीला आड काठ्या आल्या होत्या. आता मागील काही दिवसांपासून मजुर वर्गाला ने -आण करण्यासाठी पिकअप, ट्रँक्टर (tractor) आदी वाहनांचा वापर आता केला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मजुरी व्यतिरिक्त हा खर्च करावा लागत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवसांचा रोज पकडण्यात येतो.

आडजी – पडजी पद्धतीने कांदा लागवड

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई काही प्रमाणात निर्माण झाल्याने व कांद्याची रोपे तयार झाले असून ती रोपे बदलेल्या ढगाळ वातावरणामुळे भुरी होऊन खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ही रोपे लावण्यासाठी सर्वाची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांची वाट पाहाण्यापेक्षा घरातील व्यक्ती व शेजारील व्यक्ती अशा पध्दतीने जमवाजमव करून आडजी पडजीने कांदा लागवड करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या