Saturday, April 27, 2024
Homeनगर100 गोणी कांदा: मिळाले सव्वा सात लाख

100 गोणी कांदा: मिळाले सव्वा सात लाख

नगरमध्ये लाल कांद्याला 6200 रुपये भाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल झालेल्या लिलावात 100 गोणी गावरान कांद्याला तब्बल 7 लाख 26 हजार 570 रूपयांचा भाव मिळाला. कांद्यामुळे लखोपती झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे सौ. सोनाली विलास लंघे. ही महिला नेवासा तालुक्यातील शिरसगावची रहिवाशी आहे.

- Advertisement -

नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (दि.2) झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांद्याला क्विंटलमागे विक्रमी 10000 रुपये तर लाल कांद्याला 6200 रूपयांचा दर मिळाला. लासलगावातही लाल कांद्याला 8152 रुपयांचा भाव मिळाला.

कांद्याची आवक कमी होत आहे, तर देशभरात कांद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील काही दिवसात कांद्याचा भाव साधारणपणे 82 रुपयांपर्यंत गेला होता. शनिवार (दि.30) पासून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत. पहिल्याच लिलावात गावरान कांद्याला 82 रुपये तर लाल कांद्याला 62 रुपये दर मिळाला होता. सोमवारी (दि.2) रोटेशन पद्धतीने दुसरा लिलाव होता.

त्यासाठी सुमारे 15 हजार गोण्या कांदा शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला होता. कांद्याला मागणी असल्याने कांदा व्यापार्‍यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली. चांगल्या दर्जाच्या गावरान कांद्याला उच्चांकी भाव क्विंटलला 10 हजार रुपये तर लाल कांद्यालाही क्विंटलला 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या