Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजानोरीत ‘एक गाव एक गणपती’

जानोरीत ‘एक गाव एक गणपती’

जानोरी । वार्ताहर Janori

‘एक गाव एक गणपती’ बाबत जानोरीकरांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असुन इतर गावांनी देखील हा आदर्श घेऊन करोनासदृश परिस्थितीत साध्या पध्दतीने गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करा असे आवाहन नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ (PI Pramod Wagh) यांनी जानोरी येथील ग्रामपंचायत सभागृहात शांतता समितीची झालेल्या बैठकीत केले.

- Advertisement -

दिंडोरी (Dindori) तालुक्यातील जानोरी (Janori) या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असल्यामुळे अनेक उत्सव येथे परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरे केली जातात. त्यातलाच एक उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव.

साधारण पंचवीस वर्षापासून जानोरी गावामध्ये जिवंत देखावे दाखवण्याची परंपरा अद्यावत आहे. अवघ्या महाराष्ट्रात जानोरीच्या जिवंत देखाव्याची ख्याती पसरलेली आहे. त्यामुळे दूरवरून लोक येथे जिवंत देखावे बघण्यासाठी येत असतात.

पौराणिक सामाजिक आणि वैज्ञानिक स्वरूपाचे रोज नवनवीन व वेगवेगळे देखावे प्रत्येक गणेश मंडळाच्या वतीने दाखविली जातात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उत्सवांवर बाधा आली असल्याने सध्या यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी गणपतीची मूर्ती सार्वजनिक स्वरूपात न स्थापित करता आपापल्या घरीच गणेश मूर्तीचे स्थापना करण्याचे ठरविले.

रोज संध्याकाळी सर्व गावातील कुटुंबांनी 7 वाजून 30 मिनिटांनी एकाच वेळी आरती करून या करोनाचा नायनाट व्हावा, यासाठी गणरायाकडे साकडे घालण्याची आवाहन जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवाच्या आधी दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने जानोरी येथे बैठक आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जानोरी मध्ये गणेशोत्सव मंडळ यांची बैठक संपन्न झाली. यावेळी जानोरी गावात सार्वजनिक मूर्ती कोणीही न बसवता सर्वांनी आपापल्या घरीच गणपतीची मूर्ती स्थापित करायची असून रोज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी एकाच वेळी सर्व गावात आरती करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे एक आगळा वेगळा उपक्रम जानोरी गावाने राबविण्याचे योजले असून यातून सर्वांच्या मनोकामनेतून या कोरोनाचा नायनाट होईल अशी अपेक्षा जानोरीकरांनी व्यक्त केले आहे.

जानोरीकरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी स्वागत केले असून तालुक्यात इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी माजी जि. प. सदस्य शंकरराव काठे, माजी उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील सुरेश घुमरे, तलाठी किरण भोये, शंकरराव वाघ, माजी पं. स. सदस्य सुनील घुमरे यांसह गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या