Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात १ लाख ६ हजार करोनामुक्त

जिल्ह्यात १ लाख ६ हजार करोनामुक्त

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतान 24 तासात मात्र यामध्ये काहीशी वाढ झाली आहे. मागील 24 तासात 227 रूग्णांचे आहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर प्रलंबीत अहवालांचे प्रमाण वाढले असून ते 4 हजार 840 वर पोहचले आहे.

- Advertisement -

काल 154 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 6 हजार 632 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 154 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात एकुण करोना मुक्तीचे प्रमाण 96.63 टक्केंवर पोहचले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 227 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. मागील काही दिवसांमध्ये ही वाढ दिसून येत आहे. यामुळे आतापर्यंत एकुण पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 10 हजार 364 इतका झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील 153 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 72 हजार 506 वर पोहचला आहे.

काल ग्रामिण भागातील 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 32 हजार 250 झाला आहे. मालेगावमध्ये 6 रुग्ण आढळल्याने मालेगावचा आकडा 4 हजार 576 झाला आहेे. जिल्हा बाह्य 8 रुग्ण आढळल्याने त्यांचा आकडा 1 हजार 14 झाला आहे.

काल दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील १ तर ३ ग्रामिण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा १ हजार ९७२ झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा काही प्रमाणात वाढला असून दिवसभरात १ हजार २८८ नवे संशयित दाखल झाले आहेत. तर अद्याप ४ हजार ८६४ संशयितांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या