Friday, April 26, 2024
Homeनगरपालकमंत्री पवार... वास्तव की वावड्या?

पालकमंत्री पवार… वास्तव की वावड्या?

मुंबई l Mumbai

सोशल मीडियावर अचानक आ. रोहित पवार मंत्री होणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. कर्जत-जाखमेडचे प्रतिनिधीत्व करणारे धाकटे पवार थेट नगरचे पालकमंत्री होतील, ही शक्यता वास्तवात उतरणार की वावड्या ठरणार याकडे त्यांच्या समर्थकांचेही लक्ष आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधी काही फेरबदल होतील, अशी चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडे एक मंत्रीपद रिक्त आहे. या जागी राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी कोणाला, या प्रश्नाच्या उत्तरात शक्यतेची सुई आमदार रोहित पवार यांच्या नावाकडे वळली आहे.

पक्षाने तरूणांना संधी देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपद तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद मिळाले आहे. रोहित पवार यांना मंत्री करून राष्ट्रवादी नगरचा राजकीय गड मजबूत करणार का, याची उत्सुकता आहे.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद सोपविण्यात आलं. कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याने अहमदनगरचे पालकमंत्रीपदी कायम राहण्यास हसन मुश्रिफ उत्सुक नाहीत. त्यामुळे मंत्रीपद मिळाल्यास पवार नगरचे पालकमंत्रीही होतील, या शक्यतेची राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या