Saturday, April 27, 2024
HomeनाशिकNashik News : निकृष्ट रस्त्याची सरपंचाकडे तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

Nashik News : निकृष्ट रस्त्याची सरपंचाकडे तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी | Shirwade wakad

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) गोंदेगाव येथे गावांतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामाच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंच अनिल रणशूर यांच्याशी चर्चा करत असतांना जेष्ठ नागरिकास मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. पोपट गंगाधर भोसले (वय ७०) असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांनी मारहाण करणाऱ्या निलेश उर्फ बाल्या भाऊसाहेब भोसले याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) तक्रार दाखल केली आहे…

- Advertisement -

बांधकामांना हिरवे आच्छादन, ताडपत्रीचा वापर करणे बंधनकारक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोंदेगाव (Gondegaon) येथे गावांतर्गत गोंदेश्वर मंदिर-वैद्यवाडा-ते माडीची शाळा रस्त्याचे (Road) काम सुरू असून खडी टाकलेली आहे. ही खडी दाबण्यासाठी त्यावर रोलर फिरवण्याऐवजी जेसीबी फिरवले जात होते. या कामाची पाहणी करण्यासाठी सरपंच अनिल रणशूर आले असता पोपट भोसले यांनी त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली.

त्याचा राग आल्याने निलेश भोसले याने पोपट भोसले यांना शिवीगाळ केली.या कामासंदर्भात तुझा संबंध नसतांना तू बोलू नकोस असे पोपट भोसले यांनी म्हटल्यावर निलेश यांनी पोपट भोसले यांची गच्ची पकडली. कपडे फाडत खाली पाडून हाताने आणि चापटीने मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या हाताला इजा झाली असून याप्रकरणी पोपट भोसले यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ग्रामपंचायत सदस्य मासिक मीटिंगचा भत्ता देणार लोकप्रतिनिधींना

ठेकेदारांकडून गावगुंडांचा वापर?

निलेश भोसले याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. याचा वापर करून त्याने गांव आणि परिसरात दहशत निर्माण केली आहे. गोंदेगावमध्ये नवीन कामांच्या ठेकेदारांना गाठून त्यांच्याकडून अवैधपणे माती, मुरूम आणि दगड टाकण्याचे काम घेत असतो. त्याबदल्यात ठेकेदाराला तोषिश लागू नये याची काळजी घेत तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना धमकावतो. त्यामुळे ठेकेदारांचे देखील फावते आहे. या प्रकरणामुळे ठेकेदारीत गावगुंडांचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबत तक्रारी दाखल व्हायला हव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kisan Sanman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला १५ वा हफ्ता जमा होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या