Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकओझे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी

ओझे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील ओझे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलला पाच जागा मिळाल्या असून प्रगती पॅनल अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे…

- Advertisement -

वार्ड क्रमांक एक मध्ये अतिशय चुरशीची लढत होऊनआठ ते दहा मतांनी उमेदवार निवडून आले आहेत.

प्रभाग क्र. १ मधून आनंदा धुळे यांना १२५ मते मिळावून विजयी झाले. तर सागर उघडे यांना ११५ मते मिळली असून त्यांचा पराभव झाला आहे.

तर प्रभाग क्र .१ मधून कलाबाई वाघमारे यांना १२७ मते मिळाली असून त्या विजयी झाल्या तर सुरेखा धुळे यांना ११६ मते मिळाली असून त्या पराभूत झाल्या आहे.

तसेच प्रभाग क्र १ मधून विमल बर्डे यांना १२५ मते मिळाली असून अनिता पाटील यांना ११७ मते मिळाली असून त्या पराभूत झाल्या आहे.

प्रभाग क्र.२ मधून ऋषिकेश बर्डे यांना 202 मते मिळावून विजयी झाले तर सुभाष गोजरे यांना ११६ मते मिळाली असून ते पराभूत झाले आहे. प्रभाग क्र.२ मधून संगिता निगळ यांना २०३ मते मिळाली असून ते विजयी झाले तर सुवर्णा गोजरे यांना १३८ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.

प्रभाग क्र ३ मधून अनिल उघडे यांना १६१ मते मिळवून विजयी तर दिंगबर उघडे यांना अवघे ७० मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.

तसेच प्रभाग क्र.३ मधून मंगला उघडे यांना १६१ मते मिळवून विजयी झाल्या आहे. तुळसा जाधव यांना ७० मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे.

ओझे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता वार्ड क्रमांक एक मध्ये अतिशय चूरशीची लढत होऊन परिवर्तन पॅनलचे तिन्ही उमेदवार थोड्याफार फरकाने उमेदवार विजयी झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या