Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर ; ८० जणांना जेलची हवा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर ; ८० जणांना जेलची हवा

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

सोशल मीडियावर (social media) आक्षेपार्ह संदेश पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करीत त्यांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण सायबर पोलिस (Cyber ​​Police) ठाण्याच्या सूत्रांनी दिली. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश पोस्ट करणार्‍याविरुद्ध यापुढे देखील थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ग्रामीण सायबर पोलिसांनी दिला आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसाच्या काळात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही माथेफिरूंनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअप आदी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस ते व्हिडिओ पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याची दखल घेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या ८० जणांवर गुन्हे दाखल करीत त्यांची थेट कारागृहात रवानगी केली आहे.

ग्रामीण सायबर पोलिसांनी १ जानेवारी ते १७ एप्रिल या काळात ८० व्यक्ती विरोधात वरिल नमूद कलमानुसार १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात पोलीस ठाणे खुलताबाद, सिल्लोड ग्रामीण, वैजापूर, पिशोर (प्रत्येकी २ गुन्हे) तर पाचोड, बिडकीन, कन्नड शहर, फुलंब्री, गंगापूर (प्रत्येकी १) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमांतून आक्षेपार्ह संदेश पसरवून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणार्‍यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिला आहे. तसेच सायबर पोलीस ठाण्याची टीम तंत्रज्ञान व विशेष दलाच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साईडवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलीसांची सोशल मीडिया पेट्रालिंग नियमित सुरू असल्याचे कलवानिया यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या