Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारभूमी अभिलेखच्या लिपीकाविरूध्द गुन्हा

भूमी अभिलेखच्या लिपीकाविरूध्द गुन्हा

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

भूमी अभिलेख कार्यालयातील (Land Records Office) लिपीकाने (clerk) बनावट पावती देवून सहा हजार रूपये हडप केल्याचा आरोप शेतकर्‍याने (farmer) केला आहे. संबंधित लिपीकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे. फारूख निसार पिंजारी, छाननी लिपीक भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.

- Advertisement -

पोलीस सुत्रांनुसार, राजेंद्र दर्यावसिंह रघुवंशी रा.परदेशीपुरा (नंदुरबार) यांनी भूमी अभिलेख कार्यालय (Land Records Office) अर्ज करून त्यांच्या गट क्रमांक 67/01 अ व 66 यांची हद्द कायम मोजणी (Limit permanent counting) शिटची मागणी केली होती. त्यासाठी फारूख निसार पिंजारी यांनी बनावट शिट (Fake sheet) तयार करन त्यावर रिस्तेदार यांची बनावट सही करून दिले. त्यासाठी सहा हजार रूपयांची बनावट पावती तयार करून ते पैसे त्यांनी स्वतःकडे ठेवले ही बाब राजेंद्र रघुवंशी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधला.

त्यानंतर नंदुबार शहर पोलीसात (police) फिर्याद दिल्याने फारूख पिंजारी यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार प्रविण पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या