Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशLockdown in Odisha : ओडिशामध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन

Lockdown in Odisha : ओडिशामध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. ओडिशामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

- Advertisement -

ओडिशा सरकारने करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता १४ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ओडिशातील हा लॉकडाऊन ५ मेपासून ते १९ मेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. याआधी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाउन जाहीर केला होता.

ओडिशामध्ये आतापर्यंत एकूण ४ लाख ६२ हजार ६२२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ लाख ९१ हजार ४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर २०६८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या