Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र८ ऑक्टोबरचा 'ड्राय डे' रद्द

८ ऑक्टोबरचा ‘ड्राय डे’ रद्द

मुंबई। प्रतिनिधी Mumbai / Maharashtra

राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Father of the Nation Mahatma Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त पाळल्या जाणाऱ्या सप्ताहाच्या अखेरच्या दिवसाचा म्हणजे ८ ऑक्टोबरचा ‘ड्राय डे’ ‘Dry day’ राज्य सरकारने रद्द केला आहे. वर्षातील एक ‘ड्राय डे’ कमी झाल्याने मद्यशौकिनांची अडचण काहीशी दूर झाली आहे.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क (State excise duty) खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील ‘ड्राय डे’ ची संख्या कमी करण्याच्या दिशेने त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले. त्यानुसार ८ ऑक्टोबरचा ‘ड्राय डे’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू वर्षांपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

राज्यात वर्षभरात नऊ ‘ड्राय डे’ पाळले जातात. याशिवाय लोकसभा, विधानसभेसह स्थानिक निवडणुकीच्यावेळी ‘ड्राय डे’ घोषित केला जातो.यादिवशी दारू विक्रीची दुकाने आणि बार बंद असतात. त्यामुळे मद्यशौकिनांची कुचंबणा होते. ‘ ड्राय डे’ च्या आदल्या दिवशी त्यांना सोय करावी लागते. तशी सोय झाली नाहीतर अवैध मार्गाने दारू विकत घ्यावी लागते. याचा फटका राज्याच्या महसुलाला बसतो.

या पार्श्वभूमीवर तत्कालीन फडणवीस सरकारने ‘ड्राय डे’ची संख्या कमी करण्यासाठी २०१८ मध्ये विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने गांधी सप्ताहाचा शेवटचा दिवस आणि आषाढी तसेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी ‘ड्राय डे’ रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र, त्यावेळी या शिफारशीवर निर्णय झाला नव्हता. आता आघाडी सरकारने महसूल वाढीच्या उद्देशाने ‘ड्राय डे’ ची संख्या एकने कमी करून मद्यप्रेमींची अस्वस्थता कमी केली आहे.

राज्यातील ‘ड्राय डे’

२६ जानेवारी

३० जानेवारी

१ मे

आषाढी एकादशी

१५ ऑगस्ट

अनंत चतुर्दशी

२ ऑक्टोबर

कार्तिकी एकादशी

- Advertisment -

ताज्या बातम्या