डॉ. वैशाली वीर यांच्याकडून टायपिंगच्या फाईल्सचीही अडवणूक

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर ( Secondary Education Officer Dr. Vaishali Jhankar Veer ) यांच्या कथीत भ्रष्टाचार प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी केलेले अनेक कारनामे उघड होत आहेत. संगणक व टायपिंग इन्स्ट्यिट्यूटच्या ( Computer and Typing Institute ) मान्यतेच्या काही फाईल्स तब्बल दोन वर्षांपासून मंजुरीविना पडून ( Falling without approval ) असल्याची घटना नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उघडकीस आली आहे.

जिल्ह्यामध्ये संगणक टायपिंग व जुनी टंकलेखन टायपिंग या संस्थांना मान्यता दिली जाते. जिल्ह्यात साधारण टाटाच्या 180 संस्था असून मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात या संस्थांची दरवर्षी तपासणी करण्यात येते.संस्थेच्या सर्व आवश्यक बावी परिपूर्ण असल्यास त्यांची परवानगी पुढे चालू ठेवण्यात येते.

अनेक दिवसापासून एकच व्यक्ती या तपासण्या करीत असतो. अनेक संस्था स्थलांतरित झालेल्या आहेत तर काही संस्था शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनीच विकत घेतलेल्या आहेत. या व्यवस्थाना पुढीलवर्षी मान्यता सुरू राहण्यासाठी तपासणी अधिकारी व शिक्षणाधिकारी मोठे आर्थिक व्यवहार करत असल्याचे उघडकीस आले आहे.

आतासुद्धा अनेक विद्यार्थी बोगस बसतात. जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग येथून मोठ्या प्रमाणावर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी येतात. ते विद्यार्थी तिथून फॉर्म भरतात. परंतु, प्रत्यक्षात परीक्षेला ते नसतात. त्यांच्याऐवजी अन्य कुणीतरी परीक्षा देत असतो. यामध्ये मालेगाव आघाडीवर असून मालेगावमधील नगरपालिकेचा अधिकारी संस्थांवर मेहरबान असल्याचे दिसून येते.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांना विभागातील भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे सादर करण्यात येणार आहे.

– नीलेश साळुंखे शिवसेना विभागप्रमुख

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *