Friday, April 26, 2024
Homeजळगावउदय पाटील,विलास नेरकर,सुनील सूर्यवंशीसह 15 उमेदवारांच्या अर्जांवर हरकती

उदय पाटील,विलास नेरकर,सुनील सूर्यवंशीसह 15 उमेदवारांच्या अर्जांवर हरकती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ग.स.सोसायटीच्या (Co-operative Credit Bureau of District Government Servants) पंचवार्षिक निवडणुकीच्या (Five-year election) 21 जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 278 उमेदवारांनी अर्ज दाखल ( candidates applied) केले होते. आज दि.1 एप्रिल रोजी अर्ज छाननी (Application scrutiny) होऊन 278 उमेदवारांचे अर्ज वैध (Valid) ठरले आहे. तर एकही उमेदवाराचा अर्ज अवैध झालेला नाही.

- Advertisement -

या छाननीदरम्यान माजी संचालक उदय पाटील,विलास नेरकर, सुनील सूर्यवंशी, सुभाष जाधव यांच्यासह 15 उमेदवारांच्या अर्जांवर (applications of the candidates) प्रगती शिक्षक सेना गटाचे (Pragati Shikshak Sena group) प्रमुख रावसाहेब पाटील यांनी हरकती (Harkati) घेतल्या आहेत. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) संतोष बिडवई यांच्यासमोर सुनावणी झाली असून त्या तक्रारींवर सोमवारी सकाळी 11 वाजता निर्णय होणार आहे.

ग. स. सोसायटीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या 278 अर्जांची दि. 1 एप्रिल रोजी छाननी (Application scrutiny) करण्यात आली आहे.

छाननीअंती 278 अर्ज वैध ठरले असून एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. या छाननी दरम्यान रावसाहेब पाटील (Raosaheb Patil) यांनी माजी अध्यक्ष आणि माजी संचालकांच्या कार्यकाळात नातेवाईकांची भरती, मनिलँडींग, स्वेच्छा निवृत्तीनंतरही अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांसह 15अर्जांवर हरकती नोंदविण्यात (Objections reported) आल्या आहे.

त्या तक्रारींवर सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी (Hearing) होणार असून त्यानंतर दि.4 एप्रिल रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 4 ते 18 एप्रिलदम्यान माघारीची मुदत (Return deadline) आहे.

या निवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान (Voting) होऊन 30 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. सहकार, लोकसहकार, लोकमान्य,प्रगती शिक्षक सेना गट आणि स्वराज्य पॅनलच्या उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत (Pancharangi fighting) होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या