Wednesday, April 24, 2024
Homeधुळेनायलॉन मांजा विक्रेत्याला अटक

नायलॉन मांजा विक्रेत्याला अटक

धुळे ।Dhule प्रतिनिधी

प्रतिबंधीत नायलॉन मांजा (Restricted nylon cats) विक्रेत्याला (seller) स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या (local crime branch) पथकाने अटक (Arrested) केली. त्याच्याकडून 13 हजार 950 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे आगामी मकरसंक्रातीच्या दिवसात पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणार्‍यावर कारवाई करण्याची सूचना पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. त्यानुसार शहरातील अकबर चौकात अपना बेकरी समोरील पतंग विक्रेता दुकानावर पथकाने छापा टाकला असता तेथे 360 नग छोटे नायलॉन मांजाचे रोल, 33 नग नायलॉन मांजाचे प्लॅस्टीक बंडल, दोन नग नायलॉन मांजाचे सिल्वर रंगाची चक्री असा 13 हजार 950 रुपये किंमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अताउर रहिमान एकलाक अहमद याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात भादंवि 188 सह पर्यावरण कायदा कलम 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अताउर याला अटक केली आहे.

या पथकाने केली कारवाई

सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, उपनिरिक्षक योगश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, गुलाब पाटील यांच्या पथकाने केली.

नायलॉन मांजा धोकादायक

मकरसंक्रांतीला पतंग उत्सव साजरा केला जातो. परंतू नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करु नये, प्रतिबंधीत अवैध नायलॉन मांजा विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलीस यंत्रणेला द्यावी.

-प्रवीणकुमार पाटील, पोलीस अधिक्षक, धुळे.

- Advertisment -

ताज्या बातम्या