Friday, April 26, 2024
Homeनाशिकपरिचारिका 'या' दिवशी काम बंद ठेवणार

परिचारिका ‘या’ दिवशी काम बंद ठेवणार

नाशिक | Nashik

कोवीड रूग्णालयात कार्यरत परिचारीकांना आवश्यक विविध सुविधा व मागण्यांसाठी जिल्हा तसेच राज्यभरातील परिचारीकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करणार असल्याचे पत्रकाद्वारे जाहिर केला आहे.

- Advertisement -

जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोवीड रूग्णालयात काम करणार्‍या परिचारीकांना सात दिवस काम व सात दिवस कोरोंटाईन करण्यात यावे, कोवीड रूग्णालयात पीपी किट घालून ८ तसा काम करणे त्रासदायक होत असल्याने पीपी किट घातल्यानंतर ४ तासाचे काम असावे, कोवीड रूग्णालयासांठी परिचारीकांची भरती करावी, बाहेरगावच्या परिचारीकांची रहिवासाची व्यवस्था करण्यात यावी, मुंबई प्रमाणे कोविड रूग्णालयात कार्यरत परिचारीकांना ३०० रूपये दररोजचा भत्ता देण्यात यावा,

पीपी किटसह सर्व साधन सामुग्री उच्च दर्जाची व पुरेशा प्रमाणात मिळावी, कोवीड रूग्णालयात काम करणार्‍या परिचारीकांची सातत्याने स्वॅब तपासणी करण्यात यावी, त्यांच्यासाठी २० टक्के खाटा रिक्त ठेवाव्यात, कोवीड रूग्णालयात काम करताना परिचारीकेचा मृत्यू झाल्यास तात्काळ ५० लाखाचा विमा तीच्या कुटुंबियांना मिळावा, बंधपत्रित व प्रभारी परिचारीकांना कायम स्वरूपी सेवेत घेण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या