आता एसीबी घेणार शिक्षणाधिकाऱ्याची प्रेझेंटी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एका शिक्षण संस्थेला नियमित वेतन सुरू करण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अडकलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (Nashik Education Officer Dr Vaishali Zankar) यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, दर सोमवारी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत…

ठाणे (Thane)येथील एका शिक्षण संस्थेतील शिक्षकांना अनुदानित वेतन नियमीत करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (Demand for eight lakh rupees bribe) यांच्या वाहनचालकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांचे नाव सांगितल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती. यासोबतच प्राथमिक शिक्षकाचाही यात समावेश असल्याने त्याची देखील चौकशी होऊन कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, सहआरोपी असलेल्या ज्ञानेश्वर येवले (Dnyaneshwar Yeole) आणि पंकज दशपूते यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, महिला असल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याने आणि चौकशीला सुरुवातीला प्रतिसाद न दिल्याने डॉ. झनकर यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *