Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपातील सदस्यसंख्या १५ टक्के वाढणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

नाशिक मनपातील सदस्यसंख्या १५ टक्के वाढणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यानंतर राज्यातील नाशिकसह (nashik)१८ महापालिकांच्या निवडणुकीच्या (corporation election)पार्श्वभूमीवर एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत(cabinet meeting) मंजूर झाला. यामुळे नाशिक (nashik)हापालिकेत १२२ जागांमध्ये १५ टक्के वाढ होणार आहे. यामुळे नाशिकमधील नगरसेवकांची संख्या १८ ने वाढून १४० पर्यंत जाणार आहे. नगरसेवकांच्या वाढीमध्ये प्रत्यक्षात सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना कसा फायदा करता येईल यादृष्टीने नियाेजन असल्याचे बाेलले जाते. मुंबई मनपातील नगरसेवकांची संख्या मात्र वाढणार

शासनाचे स्पष्टीकरण : जलयुक्त शिवारला क्लिन चिट नाही, चौकशी सुरु

- Advertisement -

मुंबई महापालिका वगळता राज्यातील २७ महापालिका व ३७९ नगरपालिका-नगरपंचायतीमधील जागा वाढवण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करीत आहे. सद्यस्थितीत २८ अाॅगस्ट २०२१ राेजी राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुकीसाठी कच्ची प्रभागरचना करण्याचे आदेश दिले गेले.

नाशिकचा विचार केला तर १२२ जागांसाठी प्रभागरचना केली जाणार असून त्यानुसार ४० प्रभाग हे तीन सदस्यीय तर एक प्रभाग दाेन सदस्यीय असणार आहे. या सदस्यसंख्येत १५ टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली.

महाविकास आघाडीसाठी पाेषक

सद्यस्थितीतील नगरसेवकांच्या संख्येपेक्षा १५ टक्के जागा वाढवल्यास नाशिक महापालिकेत १४० नगरसेवक होणार आहे. सध्या नाशिक पालिकेत १२२ पैकी सेनेचे ३५ नगरसेवक तर राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी सहा नगरसेवक आहेत. आघाडी झाली तर सेना किमान ८० जागांवर दावा करेल. अशा स्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेस यांना प्रत्येकी ३० जागा मिळू शकतील. दुसरीकडे, भाजपसाठी एकट्याने इतक्या जागा लढवणे अवघड हाेईल.

प्रभागरचनेवर हाेणार परिणाम

सद्यस्थितीत तीन सदस्यीय पद्धतीने कच्ची प्रभागरचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १८ नगरसेवकांची संख्या वाढल्यास प्रभागरचनेवर त्याचे परिणाम हाेतील. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करण्याची वेळ येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या