Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकआता संघर्ष सरपंच, उपसरपंच खुर्चीसाठी

आता संघर्ष सरपंच, उपसरपंच खुर्चीसाठी

ओझे । वार्ताहर Dindori / Oze

दिंडोरी तालुक्यात साठ ग्रामपंचायती पैकी सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहे तर 53 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहिर होऊन निकाल जाहिर झाला आहे. त्यानुसार येत्या 28 जानेवारी आरक्षण जाहिर होणार आहे, त्यांमुळे अनेक गावामध्ये कमी संख्याने निवडणून आलेल्या पॅनल प्रमुखाकडून संरपच, उपसरपंच पदाच्या खूर्चीसाठी गणित जुळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फोडाफोडीच्या राजकारणा सुरुवात झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

- Advertisement -

तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले असून प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे बहुमत आलेल्या गटातील सदस्य आपल्या गळाला लावून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न होताना दिसत आहे. दुसर्‍या गटातील सदस्याना सरपंच व उपसरपंच पदाचे अमिष दाखविण्यासाठी जोरदार हालचाली होत आहे. निवडणुकीनंतर सर्वच गावामध्ये वातावरण शांत होईल असे चित्र होते मात्र तसे न होता अनेक गटामध्ये जोरादार बैठका होत आहे.

आपल्यातील कुणी फुटणार तर नाही ना यांची काळजी पॅनल प्रमुखकडून होताना दिसत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये तरुणाईने प्रवेश केल्यांमुळे वर्षानुवर्ष सत्तेत असणार्‍या लोकांना मोठा धक्का बसला आहे. तरुण वर्गाने ग्रामपंचायत राजकारणात प्रवेश केल्यामुळे अनेक गावामध्ये निवडणुकीला रंगत आली होती. प्रत्येक उमेदवार आपल्या वार्ड मध्ये प्रचार करणार्‍या उमेदारावर बारकाईने लक्ष देत होता. अनेक उमेदवारानी रात्री मतदारराजा झोपलेला असताना सुद्धा प्रभागाची राखणदारी केलेली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुका अटीतटीच्या झालेल्या आहे.

या निवडणुकीत एकच वार्डात तीन तीन उमेदवार उभे असूनही मतदारानी अतिशय अचूक मतदान केल्यांचे दिसून आले. कदाचित मतदान करताना अशिक्षित मतदाराकडून चूक होईल, अशी शक्यता होती मात्र हे सर्व दावे फोल ठरले आहे. त्यामुळे मतदार खूप जागृत असल्याचे दिसून आले आहे. सध्या गावपातळीवर खूर्चीसाठी संघर्ष सुरु झाला असून सरपंच, उपसरपंच पदासाठी रस्सीखेच पाहण्यास मिळत आहे. पश्चिम भागातील ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात चुरस पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायती आरक्षित असल्यामुळे आरक्षणामुळे स्त्री, पुरुष एवढाच बदलू शकतो आशा ग्रामपंचायतीमध्ये फक्त उपसरपंच पदाच्या खूर्चीसाठी रस्सीखेच पाहण्यास मिळत आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील खेड्यांमध्ये अजूनही पाहिजे तसा विकास न झाल्यामुळे मतदारराजाकडून या ग्रामपंचायत निवडणूकीत नाराजीचा सुर ऐकण्यास मिळत होता. त्यामुळे अनेक दिग्गज उमेद्वारांना पराभवाची धुळ चारलेली दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या