रस्त्यांवर लागले सुचना फलक; थोरात यांच्या पाठपुराव्याला यश

jalgaon-digital
2 Min Read

पंचाळे । वार्ताहर | Panchale

तालुक्यातील पंचाळे (panchale) गावातून जाणार्‍या मुख्य रस्त्यांवरील (main road) गतीरोधकांवर (speed ​​breaker reflectors) रिफ्लेक्टर व सुचना फलक (information boards) नसल्याने छोटे-मोठे अपघात होत होते.

यासाठी ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता उमाकांत देसले (Umakant Desale, Assistant Engineer, Public Works Department) यांना निवेदन (memorandum) देत तात्काळ रिफलेक्टर व सुचना फलक लावण्याची मागणी केली होती. बांधकाम विभागाने नुकतेच गावातून जाणार्‍या मुख्य रस्त्यावर सुचना फलक व रिफलेक्टर लावल्याने ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. पंचाळे गावातून जाणार्‍या सर्व मुख्य रस्त्यांवरील अस्तित्वात असणार्‍या गतिरोधकांवर रिफ्लेक्टरचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला होता.

पुढे गतिरोधक (speed ​​breaker) असल्याच्या सांकेतिक खुणा असलेले फलक देखील नसल्याने नविन अथवा बाहेर गावाहून येणार्‍या प्रवाशांना पुढे गतिरोधक असल्याचे लक्षात येत नव्हते. अचानक आलेल्या गतीरोधकांमुळे गाडीचा वेग कमी होत नसल्याने व रात्रीच्या वेळी हे गतीरोधक दिसतच नसल्याने छोटे-मोठे अपघात (accidents) होत होते. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी थोरात यांनी बांधकाम विभागाला निवेदन देत यासाठी मागणी केली होती.

नुकतेच देसले यांनी पूढाकार घेत पंचाळे-देवपूर रस्त्यावर बाळूकाका थोरात यांच्या दुकानासमोर आणि पंचाळे-शहा-कोळपेवाडी रस्त्यावर कशाई मंदिराजवळील गतिरोधकांना रिफ्लेक्टर लावून तिथे सुचनाफलक बसविण्यात आले. तसेच संजू दवंगे यांच्या पोल्ट्रीलगत अपघाती क्षेत्र असल्याने ‘पुढे पूल आणि अपघाती क्षेत्र आहे’ असे दर्शविण्यासाठी एक फलक लावण्यात आला. यापुढील टप्प्यात पंचाळे-सोमठाणे, पंचाळे–वावी, पंचाळे-पांगरी या रस्त्यांवर रिफ्लेक्टर आणि बोर्ड बसविण्यात येतील अशी माहिती देसले यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *