Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारतळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी १३७ जणांचे नामांकन दाखल

तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी १३७ जणांचे नामांकन दाखल

तळोदा Taloda

तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतच्या (Gram Panchayats) सदस्यत्वासाठी ६०७ तर सरपंचपदासाठी (post of Sarpanch) १३७ जणांनी निवडणूक निर्णय अधिकऱ्यांकडे नामांकन (Nominations) दाखल (filed) केले दरम्यान नामांकणांसाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात आपले समर्थक बरोबर आणल्याने वामनराव बापूजी मंगल कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते.

- Advertisement -

तळोदा तालुक्यात प्रथमच ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. सोमवारी ४६३ सदस्यांसाठी ६०७ जणांनी अर्ज दाखल केले तर सरपंच पदाच्या ५५ जागांसाठी १३७ अर्ज दाखल झाले आहेत. सदस्य व सरपंच असे दोघे मिळून ७४४ जणांनी अर्ज दाखल केले आहे. प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया तळोदा येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात घेण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात सर्मथकही आणले होते. त्यामुळे या मंगल कार्यालयाला एकप्रकारे यात्रेचे स्वरूपच आले होते. याशिवाय कार्यालयाच्या प्रगणात वाहनांची प्रचंड रिग लागली होती. दरम्यान तब्बल ५५ ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे ग्रामीण भागात चावडी चावडीवर निवडणुकीच्या चर्चा रंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे. इच्छुकांकडून मतदारांची मनधरणी बरोबरच ओल्या व सुक्या पार्ट्या होत असल्याचे म्हटले जात आहे. तथापि प्रथमच जनतेमधून गावाचा कारभारी निवडणार असल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे.

पहिल्या टप्प्यांचे प्रशिक्षण शनिवारी देण्यात आले. यात १५ कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे निवडणूक कामी प्रशासनाने ७६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना शनिवारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार शैलेश गवते, व सहकारी प्रशिक्षण घेत आहे. दरम्यान दुसऱ्या टप्याचे प्रशिक्षण येत्या ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या