Saturday, May 4, 2024
Homeनाशिकत्र्यंबकच्या हरिहर गडावर पर्यटकांना बंदी; 'या' तारखेनंतरच मिळणार प्रवेश

त्र्यंबकच्या हरिहर गडावर पर्यटकांना बंदी; ‘या’ तारखेनंतरच मिळणार प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar) हरिहर गडावर (Harihar fort) निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. या गडाची वाट अतिशय अरुंद आहे, त्यामुळे वाढलेल्या गर्दीमुळे याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जाते आहे….(no entry at harihar fort till July 17 trimbakeshwar nashik)

- Advertisement -

त्यामुळे पुढील तीन दिवस हरिहर गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती नाशिक वनविभाग व उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी दिली.

हरीहर गडावर पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक फोटो आणि व्हिडीओ याठिकाणचे व्हायरल झाले होते. त्यामुळे येथील एकूणच गर्दी लक्षात घेता अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गर्ग यांनी सांगितले.

येत्या 17 जुलै 2022 पर्यंत नागरिकांनी हरीहर गडावर व परिसरात नागरिकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करून नये. जर कुणी याठिकाणी बंदीकाळात प्रवेश करेल त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कुणीही हरिहर गडावर पर्यटनासाठी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या