Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानितीश कुमार, तेजस्वी यादवांनी घेतली राहुल गांधींची भेट; काय झाली चर्चा? वाचा...

नितीश कुमार, तेजस्वी यादवांनी घेतली राहुल गांधींची भेट; काय झाली चर्चा? वाचा सविस्तर

नवी दिल्ली |New Delhi

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lokshabha Election 2024) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी (Formation of Lok Sabha Elections) सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे…

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे अध्यक्ष खर्गे हे भाजपला टक्कर देण्यासाठी समविचारी पक्षांमध्ये एकोपा निर्माण करत विरोधी नेत्यांशी चर्चा करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच खर्गे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर ही भेट झाल्याने या भेटीस महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुढील ५ दिवसात राज्यात पावसाची शक्यता; वाचा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

दरम्यान, यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar), उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांच्यासह कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) जेडीयु अध्यक्ष लालन सिंह (Lalan Singh) बिहार सरकारचे मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंह उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या