Saturday, April 27, 2024
Homeनगरनिपाणी वडगाव येथे धाडसी चोरी, दागिने लांबविले

निपाणी वडगाव येथे धाडसी चोरी, दागिने लांबविले

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील निपाणी फाटा परिसरातील श्री. कनगरे गुरुजी यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. यावेळी चोरट्यांनी दमदाटी करत महिलांच्या गळ्यातील तसेच कानातील सोने ओरबाडून नेले. काल रात्री चोरीची ही घटना घडली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

काल सुमारे रात्री सव्वादोन ते पावणेतीन दरम्यान राहत्या चोरट्यांनी कनगरे यांच्या घराचा दरवाजा कटवणीच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. त्यांनी कपाटाची उचकापाचक केली. यावेळी श्री. कनगरे पती-पत्नी झोपलेले होते. चोरट्यांची चाहुल लागल्याने ते जागे झाले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दोघांना दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच महिलेच्या गळ्यातील तसेच कानातील सोने ओरबाडून नेले. गळ्यातील सोने तुटत नसल्याने चोरट्याने दाताने तोडले. यावेळी शेजारील खोलीत झोपलेले मुलगा व सुन जागे झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत दोघांनीही आरडाओरड करत घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली. त्यामुळे चोरटे दागिने व रक्कम घेऊन पसार झाले.

पोलीस पाटील पती संजय गायधने यांनी मोबाईलवरून ग्राम सुरक्षा यंत्रणेला घटनेची माहिती दिली. यावेळी दोन ते अडीच हजार नागरिकांना तात्काळ मेसेज गेल्याने नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे यांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस हवालदार संतोष परदेशी, रघुनाथ खेडकर, पोलीस नाईक किरण पवार, अमोल जाधव, भारत पंडीत, चालक बाळासाहेब गिरी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

त्यानंतर वरिष्ठ अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, नगर येथील क्राईम ब्रँच पथकातील मेघराज कोल्हे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, चालक संभाजी कोतकर, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी घटनेची श्वान पथकाच्या मदतीने पाहणी करत परिसरातील संशयित वस्तूंवरील हाताचे ठसे घेतले. यावेळी पोलीस हवालदार संतोष परदेशी, अशोक सहकारी साखर कारखाना संचालक सोपानराव राऊत, संजय गायधने, मुरलीधर राऊत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने श्री कनगरे पती-पत्नीसह कुटुंबामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ संपर्क होऊन ग्राम सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याबद्दल नागरिकांमधून बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरीकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या