Friday, April 26, 2024
Homeनगरनिमगावजाळीच्या विश्रामगृहाची दयनीय अवस्था

निमगावजाळीच्या विश्रामगृहाची दयनीय अवस्था

निमगावजाळी |वार्ताहर| Nimgav Jali

संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील विश्रामगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या विश्रामगृहाला देखभालीसाठी पूर्णवेळ कर्मचारी देण्यात यावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

- Advertisement -

लोणी- संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी येथे इंग्रज राजवटीत विश्रामगृह बांधण्यात आले होते. मात्र ते आता पूर्ण जिर्ण झाले आहे. त्याच्याच बाजूला गेल्या 5 ते 6 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. शासनाने एवढा मोठा निधी खर्च केला मात्र या विश्रामगृहाची देखभाल करण्यासाठी कर्मचारी नेमला नाही. त्यामुळे या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. परिसरात काटेरी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

गवत वाढले आहे. त्यामुळे हे विश्रामगृह जंगलात असल्याचे भासू लागले आहे. पूर्वी या विश्रामगृहावर पूर्णवेळ देखभालीसाठी कर्मचार्‍याची नियुक्ती होती. नव्याचे दिवस संपताच कर्मचारी नसल्याने हे विश्रामगृह बेवारस झाले आहे. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी आल्यावर त्यांच्या विश्रांतीसाठी हे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. मात्र कर्मचारी नसल्याने विश्रामगृह शोभेची वास्तू झाले आहे.

त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहे. विश्रामगृह बंदच ठेवायचे होते तर आता पुन्हा नव्याने रंगरंगोटी का केली असाही सवाल उपस्थित होतो आहे. देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या