Thursday, April 25, 2024
Homeनगरनिंबळकमध्ये दहा दिवस लॉकडाऊन

निंबळकमध्ये दहा दिवस लॉकडाऊन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा वाढता संसर्ग पाहता निंबळक येथील ग्राम सुरक्षा समितीने 14 तारखेपर्यत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सकाळी 8 ते 12 वाजेपर्यतच दुकाने उघडे राहणार आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली.

निंबळक (ता.नगर) भागात करोना रुग्णाची संख्या दिवसोदिवस वाढत आहेत. गावाला लागून एमआयडीसी असल्याने कामावर जाणाच्या कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. गावामधून परिसरातील सहा ते सात गावामधून नागरिकांची निंबळक मार्ग रहदारी चालू असते. कंपनीतून सुटल्यानंतर कामगार भाजीपाला, किराणा तसेच इतर साहित्य घेण्यासाठी येथील मुख्य चौकात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.

बहुतेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहे. यामुळे करोना रुग्णाची संख्या वाढत आहे.यावर नियत्रंण आणण्यासाठी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक घेण्यात आली. सकाळी 8 ते 12 वेळेत दुकाने उघडे राहतील आणि त्यानंतर दवाखाना, मेडीकल व दुध डेअरी फक्त उघडे राहतील. समिती गावावर लक्ष असणार विनाकारण फिरणारे, तसेच विना मास्क फिरणार्‍याला शंभर रूपये दंड करण्यात येणार आहे.

गावात ज्या भागात करोनाचे रुग्ण सापडले तो परीसर दहा दिवसासाठी बंद केला आहे. हे निर्णय गावच्या हितासाठी घेतले आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य लामखडे यांनी केले आहे. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कोतकर, घनश्याम म्हस्के, भाऊराव गायकवाड सोमनाथ खांदवे, समीर पटेल, तलाठी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या