Thursday, April 25, 2024
Homeनगरनिळवंडे डाव्या कालव्याच्या कामामुळे तुटलेल्या पाईपलाईन जोडून देणार

निळवंडे डाव्या कालव्याच्या कामामुळे तुटलेल्या पाईपलाईन जोडून देणार

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाईन जोडून देणार असल्याचे महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी मान्य केल्याची

- Advertisement -

माहिती जेष्ठ नेते मिनानाथ पांडे यांनी दिली. पांडे पुढे म्हणाले की, निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे

कि.मी. क्र. 2 ते 27 मधील निब्रळ 77,म्हाळादेवी 142, मेहेंदुरी 88, बहिरवाडी 29,उंचखडक 53,ढोकरी 24,टाकळी 34, गर्दनी 10,खानापूर 15,सुगाव खुर्द 20,कुंभेफळ 10 अशा एकूण 502 शेतकऱ्यांच्या तुटलेल्या आहेत,त्या पुन्हा जोडून देण्याचया बाबतीत शेतकऱ्यांच्या व स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे जलसंपदा खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला आहे.

सदर कामाची अतिरिक्त दरवाढ सुचि मान्य करण्याबाबत कार्यकारी संचालक,गोदावरी महामंडळ औरंगाबाद यांना 5 नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठवला आहे.महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळासह आपण कार्यकारी संचालक व जलसंपदा मंत्री सदर प्रस्ताव त्वरित मान्य करण्याबाबत विनंती करण्याची नुकतीच मागणी केलेली आहे.अशी माहिती जेष्ठ नेते मिनानाथ पांडे यांनी दिली आहे.

तसेच महसूल खात्याच्या संबंधित प्रश्नावर सुद्धा जिल्हाधिकारी,अहमदनगर यांना सूचना करण्याचा आग्रह धरला.तसेच निळवंडे कालवा बाधितांच्या न्याय्य मागण्या मान्य करू असे ना.थोरात यांनी मान्य केल्याचे पांडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या