Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळा : भेंडी येथील मामांचा आगळावेगळा धोंडा

देवळा : भेंडी येथील मामांचा आगळावेगळा धोंडा

खामखेडा । khamkheda

पुरूषोत्तम-अधिक मासानिमित्त घराघरात धार्मिक पुजाविधींसह भागवत कथेचे श्रवण केले जात आहे.

- Advertisement -

तसेच जावई-भाच्यांना सन्मानाने घरी बोलवून जेवणासह यथोचित वाण देत सन्मान देखील केला जात आहे. कांदे बियाणाची टंचाई लक्षात घेत भेंडी, ता. कळवण येथील मामाने भाच्यांना चक्क एक पायली कांदा बियाणांचेच वाण लावत आगळावेगळा धोंडा साजरा केल्याने तो परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.

ग्रामीण भागात खरिप कांद्याच्या लागवडीला चांगला उतारा मिळत नसल्याचे लक्षात येताच रब्बी कांदा लागवडीसाठी शेतकर्‍यांच्या बियाण्यांवर उड्या पडल्या आहेत.

मात्र नाशिकसह राज्यभरात कांदा बियाणांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दर तब्बल दुप्पट म्हणजे चार हजार रुपये किलो झाले आहेत. एका पायली साठी मोजावे लागतात सोळा हजार रुपये. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

अधिक मासानिमित्त जावई व भाच्यांना वाण देण्यासाठी मिष्ठान्नासह सोने-चांदीचे दिवे व इतर साहित्य दिले जात आहे. जावयांसाठी हा सुगीचा महिना ठरला असून विशेषतः नवविवाहितांसाठी सासूरवाडीहून भेटवस्तूंची रेलचेल सुरू आहे.

कांदा बियाणांची टंचाई लक्षात घेत भेंडी येथील शेतकरी रावण नागू रौंदळ, दीपक रौंदळ, अशोक रौंदळ या मामांनी भाच्यांना धोंडा निमीत्ताने आमंत्रण देऊन योगेश नानाजी पाटील (दह्याने) ओतूर ता कळवण व अविवाहित भाचे अक्षय प्रशांत निकम विठेवडी याना भेंडी येथे आमंत्रण दिले.

मामांकडे आलेल्या भाच्यांच्या जेवणाच्या ताटासमोर वाण म्हणुन प्रत्येकी एक-एक पायली कांदा बियाणे चे वाण ठेवले. बियाणांचे वाण पाहून दोघे भाचे देखील मनस्वी आनंदित झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या