Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक मनपाकडुन 1 लाखाची भरपाईची न्हाईची मागणी

नाशिक मनपाकडुन 1 लाखाची भरपाईची न्हाईची मागणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक शहरातील नवीन नाशिक विभागात महामार्गालगत सर्व्हिेस रोड फोडल्याच्या कारणावरुन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) नाशिक कार्यालयाकडुन 1 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी नाशिक महानगरपालिकेकडे केली आहे. यामुळे आता मनपा प्रशासनाकडुन हा रस्ता दुरुस्तीची तयारी केली आहे.

- Advertisement -

नवीन नाशिक विभागात अलिकडच्या काळात महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोड लगत माती असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम महापालिकेकडुन करण्यात आले आहे. याकरिता काही भागात रस्ता फोडण्यात आला आहे. अशाप्रकारे महापालिकेकडुन सर्व्हिस रोड फोडण्याचे कारण देत न्हाई कडुन महापालिकेला नुकतेच एक पत्र पाठविण्यात आले आहे. यात नवीन नाशिक भागात सेवा रस्ता फोडल्याकडे लक्ष वेधत या नुकसानीपोटी 1 लाख रुपयांची भरपाई करावी असे या पत्रात म्हटले आहे. यापत्रानंतर महापालिकेकडुन ही रक्कम न देता हा रस्ता दुरुस्त करुन देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे.

रस्ता दुरुस्त करुन देणार : चव्हाण

नवीन नाशिक भागात महामार्गालगतच्या सेवा रस्तालगत डांबरी रस्ता फोडलेला नसुन आम्ही मातीच्या भागात पाणी पुरवठा पाईपलाईन टाकलेलाी आहे. असे असतांना त्यांनी भरपाईकरिता पत्र पाठविले आहे. तेव्हा वास्तव लक्षात घेऊन रस्ता खोदल्याच्या ठिकाणी आम्ही लवकरच खडी टाकुन रस्ता दुरुस्त करुन देणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता पी. बी. चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या